राज्यात २४ तासात १२० पोलिसांना कोरोनाची लागण

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे एका पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून, एकूण १२० पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत राज्यात १३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ पोलीस अधिकारी तसेच १२४ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत १३७१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये १४५६ पोलीस अधिकारी तर १२२६० पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. सध्या राज्यात २५२८ पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून, यात ३३१ पोलीस अधिकारी तर २१९७ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात ११०४९ पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून, यामध्ये १११० पोलीस अधिकारी तर ९९३९ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post