रोहित धोनीला म्हणाला १९ ला भेटू!

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - टीम इंडियाचा माजी सार्वकालिक महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शनिवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. मात्र, कारकीर्दीच्या निर्णयाने धोनीने सर्वांनाच चकित करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी 'कॅप्टन कूल'नेदेखील अशाच पद्धतीने भारतीय कसोटी क्रिकेटला बाय आणि वनडेमधील कर्णधारपदाची धुरा सोडली. आता पुन्हा कोणाचीही अपेक्षा नसताना धोनीने निवृत्तीची घोषणा केली.

धोनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ बॅकग्राउंडला मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है या गाणे आहे. व्हिडिओ शेअर करताना धोनीने लिहिले की आतापर्यंत तुमच्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. संध्याकाळी १९.२९ पासून मला निवृत्त म्हणून समजा.

त्याच्या या टायमिंग संदर्भ देत हिटमॅन रोहित शर्माने धोनीला शुभेच्छा दिल्या. त्याने ट्विट करून म्हटले आहे की,  भारतीय क्रिकेटमधील एकमेव प्रभावशाली... त्याचा क्रिकेटवर प्रभाव जबरदस्त होता... जो एका व्हिजनसह होता आणि त्याला संघबांधणी चांगलीच ठाऊक होती. आम्हाला त्याची निळ्या जर्सीमध्ये नक्कीच उणीव भासेल, पण पिवळ्या जर्सीमध्ये तो आपल्यासोबत असेल. १९ तारखेला  नाणेफेकसाठी भेटू.   

यामध्ये रोहितने उल्लेख केलेल्या १९ तारखेपासून म्हणजेच पुढील महिन्यात आयपीएलला संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रारंभ होत आहे. आयपीएलमधील सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई आणि रोहित कर्णधार असलेल्या मुंबईमध्ये होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post