मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनवर केला खुलासा...


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यात लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण: लॉकडाऊन उठवण्यासाठी कोणतीही गडबड करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोविड टास्क फोर्सशी त्यांनी काल (ता.१५) व्हर्च्युअल मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. कोरोनाचा परिणाम फक्त ज्येष्ठ नागरिकांवर होतो, मुलांना होत असा गैरसमज झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर तब्बल ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण  झाली आहे.  सहा महिन्यांच्या बाळापासून ते कोणालाही त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे अतिआत्मविश्वासामुळे कोणताही निर्णय घेणे आपल्यासाठी उचित होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. 

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही पहिल्या टप्प्यात आहोत. कोणत्याही परिस्थितीत मला कोरोनाची दुसरी लाट राज्यात नको आहे. या सर्व परिस्थितीचा गरीबांना सर्वांत मोठा फसल्याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. जर मुलांना शाळेत कोरोनाची बाधा  झाली तर तो कर्मचाऱ्यांमध्ये पसरेल. त्यामुळे शिथिल करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा लादावा लागेल आणि आपल्या हातात काहीच असणार नाही.  आम्ही टप्प्याटप्प्याने  मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून लॉकडाऊन उठवत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post