माय अहमदनगर वेब टीम
गुरुग्राम - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे होमगार्ड मंत्री चेतन चौहान यांचे आज ( दि. 16 ) निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता या खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ढासळल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.
जुलै महिन्यात चेतन चौहान यांचा कोरोना चाचाणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर चौहान यांना लखनऊमधील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री चौहान यांची प्रकृती ढासळली त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या यकृतावर झाला होता.
चेतन चौहान यांनी क्रिकेटच्या मैदानाबरोबरच राजकीय आखाड्यातही चांगला जम बसवला होता. ते उत्तर प्रदेशातील अमरोहा लोकसभा मतदार संघातून 1991 आणि 1998 असे दोन वेळा निवडून आले होते. ते सध्या योगी सरकारमध्ये ते होमगार्ड मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांना 1981 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. चेतन चौहान आपल्या 12 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत 40 कसोटी सामने खेळत 2 हजार 84 धावा केल्या आहेत. त्यात 16 अर्धशतकांचा आणि दोन विकेट्सचा समावेश आहे. त्यांनी भारताचे महान सलामीवीर सुनिल गावस्कर यांच्याबरोबर भारतासाठी अनेकवेळी सलामी दिली होती.
Post a Comment