आणखी एका अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्नमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -दाक्षिणात्य अभिनेत्री विजयलक्ष्मीने मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने ती बचावली. विजयलक्ष्मीने याआधी अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड केले होते. व्हिडिओमध्ये म्हटले होते की, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे ती खूप तणावात होती.

रविवारी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि आपण थोड्याच वेळात मरणार असल्याचे म्हटले. व्हिडिओमध्ये तिने म्हटले की, तिने ब्लड प्रेशरची औषधे खाल्ली आहेत. ज्यामुळे तिचा ब्लड प्रेशर कमी होत जाईल आणि तिचा मृत्यू होईल. यानंतर मात्र तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'थोड्याच वेळात मृत्यू होईल'

विजयलक्ष्मीने आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिने व्हिडिओमध्ये म्हटले होते, 'हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. गेल्या चार महिन्यांपासून सीमन आणि त्याच्या पक्षाच्या लोकांमुळे मी खूप तणावात आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा खूप प्रयत्न केला. ते आता शक्य नाही. हरी नादर यांनी मीडियामध्ये माझा खूप अपमान केला आहे. मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. काही वेळात, माझे ब्लड प्रेशर कमी होईल आणि मी मरेन. मी चाहत्यांना आवाहन करते की सीमन आणि हरी नादर यांच्यासारख्या लोकांना शिक्षा द्या. लोकांचे मानसिक शोषण करणाऱ्या या लोकांना कडक शिक्षा व्हायला हवी.'

रिपोर्ट्सनुसार, विजयलक्ष्मीला चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमान हा एक तामिळ राजकीय पक्ष असून हरि नारददेखील या पक्षाशी संबंधित आहेत.  विजयालक्ष्मीने 'फ्रेण्ड्स' या चित्रपटातून तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे तिने कन्नड चित्रपटातदेखील काम केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post