दिग्दर्शक महेश भट्ट यांचीही चौकशी होणार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुकेश छाबरा, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, शेखर कपूर आणि राजीव मसंद आदींची चौकशी केली आहे. आता लवकरच मुंबई पोलिस दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. पोलिस लवकरच दिग्दर्शक महेश भट्ट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास पोलिस करण जोहर यांना देखील चौकशीसाठी बोलावू शकतात.बुधवारी वांद्रे पोलिसांनी कंगनाच्या चौकशीसाठी समन्स जारी केला होता. कंगनाच्या वकिलांनी त्यावर उत्तर दिले आहे. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांना असे पत्र पाठविले आहे. मनालीमध्ये तिच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्याची विनंती कंगनाने केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीमध्ये ती सहकार्य करू इच्छिते. पत्रामध्ये असे नमूद केले आहे की कंगना हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मुंबई पोलिस तिला थेठ भेटायला येऊ शकतात किंवा ती स्वत: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिचा जबाब देऊ शकते. तिने आपल्या वकीलांमार्फत हे पत्र पाठवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post