नेपाळनंतर बांगला देशही भारताविरुद्ध खुमखुमीत!


माय अहमदनगर वेब टीम
ढाका - भारत-बांगला देश या पारंपरिक मैत्रीतही आता चीनचे विरजण पडले आहे. पंतप्रधान शेख हसिना गेल्या 4 महिन्यांपासून भारतीय उच्चायुक्‍तांना भेट देण्याचे टाळत आहेत. शेख हसिना या पाकिस्तान-चीनच्या बाजूने झुकलेल्या असल्याचा दावा बांगला देशातील ‘भोरेर कागोज’ या दैनिकाने केला आहे.

2019 मध्ये हसिना दुसर्‍यांदा पंतप्रधान बनल्या तेव्हापासूनच अनेक भारतीय प्रकल्प रखडलेले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शेख हसिना यांच्याशी बुधवारीच फोन करून त्यांचे कान भरले आहेत. भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यापासून भारत-बांगला देशात संबंध बिघडायला सुरुवात झाली. चीनकडून बांगला देशला मिळालेल्या चिथावणीने शेवटचा हातोडा घातला. गेल्या चार महिन्यांपासून ढाक्यातील भारतीय उच्चायुक्‍त रिवा गांगुली या हसिना यांच्या भेटीची वेळ मागत आहेत; पण त्यांना साधी भेटीची परवानगीही मिळत नसल्याची स्थिती आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post