सोशल डिस्टंसिंगचे पालन करून चित्रपटगृहे सुरू होणार?



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अनलॉक २ येत्या ३१ जुलैला संपण्याची शक्यता असून अनलॉक साठी एसओपी बनविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अनलॉक- ३ मध्ये चित्रपटगृहे उघडण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी सोशल डिस्टंसिंचे पालन करणे आवश्यक आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. ज्यात १ ऑगस्टपासून चित्रपटगृहे खुली करण्यासंदर्भात म्हटले आहे. 

मार्चमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित केला. पहिला लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक २ सुरु झाला आहे. आता अनलॉक-२ येत्या ३१ जुलैला संपणार आहे.


 
चित्रपटगृहे खुली करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि चित्रपटगृह मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे. तर चित्रपटगृह मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. 

आता अनलॉक ३ मध्ये चित्रपटगृहे आणि व्यायामशाळा खुली करण्यास परवानगी देण्यात येऊ शकते. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने कोणताही विचार करण्यात आला नाही. त्याचबरोबर, राज्यांसाठी अनलॉक-३ मध्ये आणखी काही शिथिलता आणली जाण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post