जाणून घ्या आकाशातील ‘सिंघम’ची वैशिष्ट्य ; राफेल घेतले उड्डाण, थरथर कापतोय चीन-पाकिस्तान


माय अहमदनगर वेब टीम
युद्धात निर्णायक ‘ब्रह्मास्त्र’ म्हणून ओळखले जाणाऱ्या अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप आज फ्रान्सकडून भारताकडे
 झेपावली. पहिल्या खेपीत भारताला 5 राफेल विमाने मिळणार असून 29 जुलै रोजी गे विमान अंबाला एअरबेसवर उतरतील. राफेल नावाचे हे शस्त्र पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूंवर भारी पडणार आहे.

पहिल्या खेपीत मिळालेली राफेल विमान अंबाला एअरबेसवर उतरणार असून चीनसोबत तणावाच्या स्थितीत हे अत्याधुनिक विमान लडाखमधील एअरबेसवर तैनात केले जाण्याची शक्यता आहे. या भागात  भारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. त्यामुळे वायुसेना हा महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या भागात यापूर्वी अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, मिग-29, जॅग्वार विमान तैनात आहेत. अशात त्यांना राफेलची साथ मिळाल्यास अभेद्य किल्ला तयार होईल.

जाणून घेऊया चीन-पाकिस्तानला थरकाप उडवणाऱ्या आकाशातील ‘सिंघम’ची वैशिष्ट्य…

– राफेल सगळ्याच हवामानात वापरता येणार असल्यामुळे कोणत्याही हवाई मोहिमांत ते वापरले जाऊ शकते.

– मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणून ओळखले जाणारे हे विमान एका मिनिटात 60 हजार फुटांपर्यंत जाऊ शकते.

– त्याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

– राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे.

– राफेलवर असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किलोमीटर आहे.

– या विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रतितास आहे.

– अँटी शिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉग्न रेंज मिसाईल हल्ल्यातही अव्वल आहे.

– 24 हजार 500 किलोमीटरपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते.

– या विमानाला आणखी घातक बनवण्यासाठी ‘हॅमर’ मिसाईल बसवण्यात येणार असून याची रेंज 70 ते 80 किलोमीटर आहे.

– सीमेवरील बंकर उद्धवस्त करण्यात हे मिसाईल सक्षम आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post