माथाडी कामगारांना पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणारकामगार विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

अविनाश घुले यांची माहिती

हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष कॉ.बाबा आढाव यांच्या प्रयत्नांना यश

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावामुळे माथाडी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टीने जी माथाडी मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा तेथिल माथाडी मंडळांनी आर्थिक परिस्थिती नुसार माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधी मधून 5000/- रुपये इतके आर्थिक साहाय्य माथाडी कामगारांना देण्याबाबत माथाडी मंडळांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सूचनेनुसार माथाडी मंडळांनी त्वरित कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवृत्त कर्मचार्‍यांच्या नेमणुका हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने कामगार विभागाने निर्णय घेतले आहेत. यापुढे माथाडी मंडळातील निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या माथाडी मंडळामध्ये नेमणूका करण्यात येऊ नये आदि विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली. तसा प्रस्ताव अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी पाठविला होता.

खा.शरदचंद्र पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष श्री. बाबा आढाव, आ. शशिकांत शिंदे, राजकुमार घायाळ, संतोष नांगरे, विकास मगदूम व हनुमंत बहिरट यांच्या उपस्थितीत पुणे येथे माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी बैठक घेण्यात आली होती.

सुरक्षा रक्षक प्रमाणे माथाडी कामगारांना कोरोना संकटात अत्यावश्यक सुविधा मध्ये संरक्षण असावे यासाठीचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. माथाडी कामगारांना विमा कवच मिळावे अशा सूचना त्यामध्ये केल्या आहेत. अर्थ खात्याकडून तो लवकरच मंजूर होईल.

खा. शरद पवार यांच्याकडे केलेली मागणी की बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काम करणार्‍या कामगारांचा कोरोना च्या मुळे मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. सूचनेनुसार नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत. एक लाख रुपये मदत देण्यात यावी असा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ने सरकारकडे पाठवला आहे. लवकरच मयत कामगारांच्या कुटुंबाला ती मदत मिळेल. याबाबत लक्ष घातले आहे.

तसेच राज्य सल्लागार मंडळ व पुणे, मुंबई ,पिंपरी चिंचवड कामगार सल्लागार मंडळे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या संकटात कामगारांच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात खा. शरदचंद्र पवार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल खा.पवार व कामगार मंत्री दिलिप वळसे पाटील व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, कॉ.बाबा आरगडे व पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post