मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाबरोबरच राज्याचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले - प्रा.शशिकांत गाडे


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या कार्यकौशल्याने शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहचविले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने पूर्ण झाले आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार महिन्यांपासून रात्रं-दिवस काम करुन बजावलेल्या भुमिकेचे सर्व जनतेने कौतुक केले आहे. त्यांनी पक्षाबरोबर राज्याचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळाले आहे. पक्षाला आता चांगले दिवस आले आहेत. शिवसैनिकांनीही आता पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्याांसाठी राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. त्यांचे प्रश्‍न सोडवावे. नगरमध्येही पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने अंबर प्लाझा येथे वृक्षारोपण करतांना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे. याप्रसंगी प.पू.विनित दर्शनजी म.सा., विपूलदर्शनजी म.सा., ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अनिल शिंदे, अनिल बोरुडे, गणेश कवडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, अनिल लोखंडे, विजय पठारे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, दिपक खैरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्रीपदी झालेली त्यांची निवड ही नेतृत्व गुणाची ओळख करुन देणारी अशीच आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजना मोठा आधार ठरत आहेत. कोरोनाची परिस्थिती योग्यप्रकारे हाताळून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यामुळे या परिस्थितीतूनही लवकरच आपण बाहेर पडू हा विश्‍वास आहे. वृक्षारोपण करुन ग्लोबल वार्मिंगच्या संकटावर आपण मात करु शकतो. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे, त्याचे संगोपन केले पाहिजे. आज लावलेली झाडांचे भविष्यात मोठे डौलदारपणे उभी राहतील.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबदास पंघाडे, सुरेखा कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभाष चंगेडिया, अजित चोरडिया, जीवन भंडारी, सुभाष शिंगवी, चेतन छल्लानी, किरण पोळ, निलेश दुसिंग, मिलिंद गांधी, सीए किरण भंडारी, कमलेश भंडारी, सचिन कटारिया, दर्शन चानोदिया, दिपक आडेप, चेतन शिरसूल आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post