जिनपिंग यांच्या नेतृत्वात चीन खूप आक्रमक बनलामाय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा व्यवहार खूपच आक्रमक झाला असून त्रासदायकही झाला आहे. मात्र, हे फार काळ चालणार नाही, असे मत संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी व्यक्त केले आहे. 

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. संयुक्त राष्ट्रातील हेली यांच्या कार्यकाळात चीन शांत आणि धोरणी होता, असेही त्या म्हणाल्या. हेली यांनी 2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. हेली म्हणाल्या की, काही क्षेत्रांमध्ये त्यांना जागा मिळाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करीत होते आणि या क्षेत्रांमध्ये संधी मिळाल्यानंतर गुपचूपपणे आपल्याला हवे तसे करण्याचा प्रयत्न ते करीत होते. स्वतःला सम्राट घोषित केल्यानंतर शी जिनपिंग हे खूप आक्रमक झाले. ते दुसर्‍यांना त्रास देऊ लागले. अनेक देशांवर दबाव टाकून त्यांनी चीनच्या बाजूने मतदान करण्यास, बजावण्यास सुरुवात केली.

संयुक्त राष्ट्रात पद आणि नेतृत्व मिळण्यासाठी त्यांनी सर्वांना कमी लेखणे सुरू केले. त्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली. बेल्ट अँड रोड प्रकल्पांतर्गत चीनने पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी छोट्या देशांसोबत करार करण्यास सुरुवात केली. आता आपल्याला दिसते की, चीन किती आक्रमक झाला आहे. मात्र, हे फार काळ चालणार नाही. जेव्हा एखादा देश नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही, तेव्हा तेथील लोक बंड करतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post