मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पित्याने त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह पाचजणांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहे. त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंगना रणौतने पुन्हा एकदा रियासह अनेकांवर तोफ डागली आहे. रिया चक्रवर्तीला तिने ‘गोल्ड डिगर’ म्हणजेच सुशांतचा सोन्याच्या खाणीसारखा (स्वतःच्या लाभासाठी) वापर करणारी स्त्री ठरवले आहे.
कंगनाने सोशल मीडियात म्हटले आहे की रियासाठी सुशांत हा कमाईचे साधन होता. त्याच्या आत्महत्येनंतर रिया अचानक फरहान अख्तरला भेटण्यासाठी का गेली? चित्रपटसृष्टीतील माफियांनी रियाचा वापर केला होता का? आता ‘सुसाईड गँग’ने रियाला बळीचा बकरा बनवला आहे का? असे तिखट सवालही तिने विचारले आहेत. कंगना सातत्याने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करीत आहे. तिने सतत महेश भट्ट, आदित्य चोप्रा, करण जोहर आणि अन्य अनेक बॉलीवूड कलाकारांना आपल्या निशाण्यावर घेतले आहे. महेश भट्टचा सल्ला रिया का घेत होती हे एक कोडेच आहे असेही तिने म्हटले आहे. महेश भट्ट यांची थोरली कन्या पूजा दारूच्या व्यसनात अडकली होती, दुसरी कन्या शाहीन डिप्रेशनमध्ये होती, आलियाने स्वतःच आपण ‘अँक्सिटी’चा सामना केला आहे असे सांगितले होते. मुलगा राहुलचा संबंध एका दहशतवाद्याशीही जोडण्यात आला होता. ज्या माणसाची मुलं स्वतःच इतकी समस्याग्रस्त आहेत त्या माणसाचा रिया का सल्ला घेत होती तसेच महेश भट्ट सुशांतला का सल्ला देत होते? असा सवालही कंगनाने विचारला आहे.
Post a Comment