मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम सुरू होणारमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही अनलॉक-3 ची नियमावली जाहीर केली. त्यानुसार 5 ऑगस्टपासून मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने, जिम, आऊटडोअर खेळांबरोबरच खासगी वाहनांमधून प्रवासाला परवानगी दिली आहे. मात्र, आंतरजिल्हा बंदी कायम ठेवण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. निर्णय जाहीर करीत राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील रात्रीची संचारबंदी उठविण्यात येणार आहे. 

नव्या नियमावलीनुसार मॉल्स, दुकाने आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहेत. मात्र, मॉल्समधील थिएटर, फूड मॉल सुरू करता येणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील.

आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा, टेनिस, बॅडमिंटन आणि मलखांब यांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरू करण्यास मात्र परवानगी नाही. तसेच आता दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवर दोन व्यक्ती, टॅक्सी, कॅबमध्ये 1 अधिक 3, रिक्षामध्ये 1 अधिक 2, चारचाकीमध्ये 1 अधिक 3 अशी प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना मास्क अनिवार्य असेल. गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये पूर्वपरवानगी देऊन वाहने दुरुस्ती करता येतील. प्लम्बर, इलेक्ट्रिशन, पेस्ट कंट्रोल, टेक्निशियन यांना परवानगी देण्यात आली आहे. 10 टक्के कर्मचार्‍यांसह खासगी कार्यालये, बांधकामे परवानगी देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत. राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना अन्य निर्णय घेण्याबाबत अधिकारही प्रदान करण्यात आलेले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post