नगर जिल्ह्यात यंदाही मुलींचाच डंका





माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल काल (दि.29) जाहीर झाला. या परीक्षेत नगरमध्ये अपेक्षेप्रमाणे याही वर्षी पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला आहे. मात्र, पुणे विभागात जिल्हा गेल्या वर्षीप्रमाणे घसरण होऊन तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे.

यंदा जिल्ह्यातून 38 हजार 722 मुले व 30 हजार 331 मुली, असे एकूण 69 हजार 53 विद्यार्थी दहावी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात 36 हजार 753 मुले व 29 हजार 607 मुली, असे एकूण 66 हजार 360 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण 94.92, तर मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण 97.61 टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल 79.50 टक्के लागला होता. त्यामध्ये यंदा 17 टक्के वाढ झाली आहे.

दहावीच्या निकालाबाबत जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली होती. निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर कुणाला किती टक्के पडणार? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post