अमेरिकेच्या 'या' कमजोरीमुळे सोने दराचा नवा उच्चांक


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून देशात सोन्याच्या दराने शुक्रवारी ( दि. 31 ) नवा उच्चांकी स्तर गाठला. एमसीएक्स वायदे बाजारात सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 53 हजार 830 रुपयांवर पोहोचले आहेत. सोने दराने एका दिवसात सातशे रुपयांपेक्षा जास्त उसळी घेतली. अमेरिका-चीन यांच्यातील तणाव, कोरोनाचे संकट आणि अमेरिकन डॉलरच्या कमजोरीमुळे वित्‍तसंस्था मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी व अन्य धातुंची खरेदी करीत असल्याचे जागतिक बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जागतिक बाजारात सोन्याचे प्रति औंसचे दर 1970 डॉलर्सच्या आसपास स्थिर आहेत. वायदे बाजारात चांदीच्या दरातही मोठी तेजी आली आहे. एमसीएक्स बाजारात चांदीचे प्रतिकिलोचे दर आठशे रुपयांपेक्षा जास्त वाढून 63 हजार 535 रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारात चांदीचे प्रतिऔंसचे दर 23 ते 24 डॉलर्सच्या आसपास स्थिर आहेत. आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफा बाजारातील जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post