वजन कमी करून फिट राहायचंय ? माग हे 'खा'


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - अप्पे हा पदार्थ आजकाल खूप फेमस आहे. तुम्हाला देखील जर फिट राहायचं असेल तर तुम्ही नाश्त्यात अप्पे खाऊ शकतात. वजन आणि चरबी कमी करण्यासह याचे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊयात अप्पेचे फायदे.

1) पचनक्रिया सुधारून ऊर्जा मिळते – यात व्हिटॅमिन बी 12 असतं. जर सकाळीच अप्पे खाल्ले तर पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.

2) चरबी कमी होते – यात 120 कॅलरीज असतात. त्यामुळं शरीराची चरबी कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. याशिवाय याला बनवायलाही कमी वेळ लागतो.

3) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – यात अँटीऑक्सिडंट असल्यानं यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर तुम्ही डाएट करत असाल तर आहारात याचा समावेश करू शकता.

4) गॅस, अपचन, आतड्यांच्या आजारांपासून बचाव होतो – अप्पेच्या सवेनामुळं पोटाचे विकार होत नाहीत. याच्या सेवनानं तुम्ही आतड्याच्या आजारांपासून दूर राहता. सतत भूक लागण्याची समस्याही यानं दूर होते. यामध्ये अनेक पोषकतत्वं असतात.

5) कोलेट्रॉल – यामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. आपली पचनक्रिया सुधारते. फास्ट फूडपेक्षा अप्पे खाणं कधीही चांगलंच.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post