'गुलाबाचा चहा’ ! ना डाएट ना व्यायाम, जाणून घ्या हे मोठे फायदे
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - गुलाबाचे अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे आहेत. परंतु तुम्ही गुलाबाच्या वापरामुळं वजन किंवा शरीरातील चरबी कमी करू शकता तेही कमी खर्चात. यासाठी गुलाबाचा वापर कसा करायचा आणि गुलाबाचा चहा कसा बनवायचा हे आपण जाणून घेणार आहोत. याचे इतरही फायदे पाहणार आहोत.
‘असा’ तयार करा गुलाबाचा चहा
गुलाबाचा चहा तयार करताना नेहमीच ताज्या गुलाबाचा वापर करा. दिवसातून 2-3 वेळा या चहाचं सेवन करा. याने खूप फायदा होईल. हा चहा तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
– 1 ते 2 कप पाणी घ्या
– यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून नीट उकळून घ्या.
– गॅस कमीच ठेवा.
– चहा तयार झाला असल्याचं अंदाज घेऊन गॅस बंद करा.
– गॅस बंद केल्यानंतर पाण्याचा रंग बदलेला असावा.
– पुन्हा एकदा हे पाणी थोडंसं उकळून घ्या
– आता हे पाणी गाळून घ्या
– आता यात लिंबूचा रस आणि मध घाला.
– आता या चहाचे सेवन करा.
गुलाबाच्या चहाचे फायदे – या चहाचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
1) वजन कमी करण्यासाठी – गुलाबाच्या चहाचे नियमित सेवन केल्यास जलद गतीनं वजन कमी होतं. यामुळं त्वचेच्या रंगातही बदल दिसतो. यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळं तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होते.
2) पचनक्रिया सुधारते – जर पोट साफ होत नसेल तर गुलाबाच्या चहाचा खूप फायदा होतो. यामुळं पोटाचे विकार दूर होतात. मळमळ होणं, सतत ढेकर येणं, डोकेदुखी या समस्यांपासूनही आराम मिळतो.
3) टॉक्सिन्स किंवा विषारी पदार्थ शरीराबाहेर पडतात – याच्या सेवनानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात.
4) युरीनरी ट्रॅक इंफेक्शन – या चहाच्या सेवानं युरीनरी ट्रॅकच्या इंफेक्शनपासूनही बचाव होतो.
5) झोप चांगली लागते – गुलाबाच्या चहाचा शरीराला तर मोठा लाभ होतोच. याच्या सुगंधामुळं चांगली झोप लागते.
Post a Comment