‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ धोके


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - झोपण्यापूर्वी स्मार्ट फोनमध्ये सोशल मीडियावर थोडावेळ घालविल्याशिवाय अनेकांना झोप येत नाही. गरजेचे असलेले हे साधन आता व्यसन होऊ लागले आहे. याचा कामाव्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी जास्त वापर होऊ लागला आहे. काहीजण तर दिवसातील अनेक तास मोबाईलला चिकटलेले असतात. परंतु, रात्री फोनचा वापर करणे अधिक धोकादायक आहे. यामुळे कोणते धोके निर्माण होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत धोके

1 स्मरणशक्ती
रात्री फोनचा वापर सतत केल्याने स्मरणशक्ती कमी होऊ लागते. झोपेवर वाइट परिणाम होतो. झोप पूर्ण होत नाही. बॉडी मेटाबॉलिज्म बिघडते. मेंदुमध्ये होणारा ब्लड फ्लो सुद्धा प्रभावित होतो.

2 चिडचिडेपणा
शरीर व डोळ्यांना आराम न मिळाल्याने चिडचिडपणा वाढतो. यामुळे इतरही समस्या वाढतात.

3 डिप्रेशन
स्ट्रेस आणि डिप्रेशनची समस्याही होऊ शकते. सोशल मीडियामुळे हा त्रास जास्त होतो.

4 दृष्टीवर परिणाम
दृष्टीवर वाईट प्रभाव पडतो, याने आरोग्यासंबंधी समस्याही निर्माण होतात.

5 झोप
झोपेसाठी मदत करणार्‍या मिलेटोनिन हार्मोन्सवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे झोप कमी होते.

6 कॅन्सर
स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश मिलेटोनिन हार्मोनला प्रभावित करतो. यामुळे ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post