सावधान...तर त्वचेवर होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर परिणाम ! जाणून घ्या


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला पार्लरला जातात, महागडे आणि केमिकलयुक्त ब्लीच आणि फेशियल किंवा क्लिनअप करतात. परंतु सतत असं केल्यानं त्वचेचं खूप नुकसान होतं. जर तुम्ही फेशियल करत असाल तर महिन्यातून एकदाच करायला हवं. याचबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

1) खाज येते – केमिकलयुक्त क्रिम्स आणि कॉस्मेटीक्समुळं त्वचेला खाज येण्याची समस्या येते. कारण पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रिम्स सर्वांनाचा सुट करतात असं अजिबात नाही. यामुळंच पिंपल आणि खाज येण्याची समस्या येते.

2) पुळ्या येतात – जर क्रीम सुट झाली नाही किंवा मसाज चकीच्या पद्धतीनं केली गेली तर त्वचेवर पुळ्या येण्याची शक्यता असते. फेशियलनंतर जास्त कोणती समस्या उद्भवत असेल तर ती म्हणजे त्वचेची रोमछिद्रे खुली होतात, यामुळं त्वचा तेलकट होते.

3) अ‍ॅलर्जी किंवा त्वचा करोडी पडते –सतत फेशियल केल्यानं त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. यामुळं अ‍ॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्वचा कोरडी पडून मोठं नुकसानही होतं.

4) डी टॅनच्या क्रिम्स – अनेक लोक सुर्याच्या किरणांमुळं होणाऱ्या त्वचेच्या नुकसानीवर डी टॅन क्रिम्सचा वापर करतात. त्यामुळं अशा क्रिम्सचा वापर करताना काळजी घ्यायला हवी.

5) …तर डॉक्टरांशी संपर्क साधा – जर सततच्या फेशियलमुळं पुळ्या आल्या असतील किंवा त्वचेवर खाज येत असेल तर त्वरीत डॉक्टरांसोबत संपर्क साधा आणि योग्य ते उपचार घ्या. असं न केल्यास समस्या वाढू शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post