पांडुरंगाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी आंदोलन



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - दुधाला प्रतिलीटर 35 रु. भाव व अनुदान 5 रु. मिळायला हवे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अहमदनगर तहसिल कार्यालयासमोर रासपाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर यांच्या नेतृत्वाखाली पांडूरंगाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून दुध दरवाढीसाठी अनोखे आंदोलन करण्यात येवून शासनाचे लक्ष वेधले गेले. कोरोना महामारी नंतर दुधव्यवसाय संकटात सापडला आहे. दुधव्यवसायाला फटका बसल्याने दुग्धव्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत आहे. त्याला न्याय मिळायला हवा दुधाला दरवाढ झालीच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाच्या दक्षिण महिला जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर यांनी यावेळी केले.

अहमदनगर तहसिलच्या आवारात दुध दरवाढीसाठी रासपाच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. पंढरीच्या पांडूरंगाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात येऊन दुध दर वाढीसाठी राज्यसरकारला सदबुद्धी येवो यासाठी पांडूरंगा चरणी साकडे घालण्यात आले. रासपाच्यावतीने जिल्हाभर तहसिल कार्यालयांसमोर सामाजिक अंतर ठेवत दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. याविषयीचे निवेदन तहसिलदारांना सादर करण्यात आले आहे. अहमदनगरच्या तहसिलदारांनी निवेदन स्विकारले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात दुध दरवाढीसाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यात सुधारणा दिसून न आल्याने दुधाला 35 रुपये भाव व अनुदान 5 रुपये मिळावे, राज्य शासनाला सद्बुद्धी द्यावी यासाठी पांडूरंगाला दुग्धाभिषेक घालण्यात आला असून, येत्या दहा दिवसात दुधाला योग्य भाव मिळाला नाहीतर शेतकर्‍यांच्या मदतीने राष्ट्रीय समाज पक्ष सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील. जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष चिमाजी खामकर, महिला तालुकाध्यक्ष राणी बुगे, युवा शहराध्यक्ष निलेश ढवण, भांड मॅडम, श्री. कोकरे यांचेसह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post