मराठा आरक्षणावरील सुनावणी 15 जुलैलामाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होती. आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येऊ शकत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार असल्याची भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देता येणार नसल्याचं आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरु झाल्यानंतरच यावर निकाल येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post