हा परिसर कन्टेन्मेंट झोनमधून वगळून बफर झोन करावा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिका हद्दीतील तोफखाना परिसरात कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेला असून या परिसरातील मोहनबाग, सिद्धीबाग कोपरा भागात एकही रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे सदरचा भाग कन्टेन्मेंट झोन मधून वगळून बफर झोन करावा, अशी मागणी या परिसरातील नगरसेवक व नागरिकांनी केली महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील तोफखाना भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत. त्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिध्दीबाग कोपरा, तोफखाना रस्ता, शितळादेवी मंदीर, श्री लयचेट्टी यांचे घर बागडपटटी रस्ता- बागडे ज्वेलर्स, जगदीश भुवन, चितळरोड, नेहरु मार्केट, चौपाटी कारंजा दत्त मंदीर , दिल्लीगेट वेत ते सिध्दीबाग कोपरा इत्यादी भाग कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून घोषीत केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही मोहनबाग सिध्दीबाग कोपरा येथील नागरीक आपल्या काही बाबी निदर्शनास आणु इच्छितो की, वरील नमुद कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषीत केल्यानंतर सदर भाग सॅनिटाईज करणे आवश्यक होते ते करण्यात आले नाही.

तसेच सदर प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते, ती करण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी रुग्ण आढळुन आले नाहीत त्या परिसरासह आजुबाजुचा 200 मिटरचा परीसर बंदीस्त करुन प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे आणि ज्या ठिकाणी रुग्ण आढळुन आले आहेत तो परिसर खुला ठेवणे आला असल्याने रूग्णांची संख्या आजुबाजुच्या 200 मिटर परिसरामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता मोहनबाग, सिध्दीबाग कोपरा भागातील नागरीकांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या भागातील नागरीकांची तापमान तपासणी करुन घेतली आहे.

सदर भागात तपासणीअंती कुठल्याही आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. तसेच या परिसरात डॉ. गायकवाड यांचे कान, नाक, घसा तसेच डॉ. रच्चा यांचे लहान मुलांचे व महिला प्रसुतीचे रुग्णालय आहे. ते कन्टेन्मेंट झोनमुळे बंद असून नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे मोहनबाग, सिद्धीबाग कोपरा या भागातील कन्टेन्मेंट झोन वगळून तेथे बफर झोन करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post