पारनेर ‘फोडाफोडी’बाबत शरद पवार म्हणाले...
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांचे काम समाधानकारक आहे. त्यांनी योग्य पावले टाकण्याचा विचार केला होता मात्र, करोनाच्या संकटामुळे प्राधान्य बदलले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिवसातून 14 ते 15 तास बैठक होतात, यावेळी टीका करु नये असे सांगतानाच महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, नाराजी आहे, हे सगळं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही माझ्या ज्ञानात भर घातली त्यासाठी धन्यवाद, असा चिमटा काढत महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे पवार यांनी सांगितले. पारनेर हा फार लहान गोष्ट तो राज्य आणि घटक होऊ शकत नाही हे ठाकरे आणि मला माहित आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद वापर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

शरद पवार यांची मंगळवारी पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार पवार बोलत होते. राज्यात विविध प्रश्न आहेत. त्याबाबत मी सातत्याने मुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. कालची बैठकही तशीच होती, असे पवार यांनी नमूद केले. पोलिसांच्या बदल्यांवरून वाद असल्याचे जे म्हटले जात आहे त्यात जराही तथ्य नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच केल्या जातात, असेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वारंवार मातोश्री निवासस्थानी जात आहेत. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं, असे पाटील म्हणाले आहेत. त्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटलांना चिंता वाटत असेल, परंतु मला त्याबाबत काही बोलायचे नाही असे ते म्हणाले. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेले होतो. तिथून फर्लांगभर अंतरावर मातोश्री निवासस्थान होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 14 किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या टीकेबाबत बोलताना पवार म्हणाले, करोनाच्या संकटात नेतृत्व करणार्‍या प्रमुख लोकांनी बाहेर पडणं योग्य नाही. ते बाहेर पडल्यास गर्दी होते आणि तेच नेमके टाळण्याची गरज आहे. या आजाराचा तोच मुख्य नियम आहे. काम करण्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे असे नाही. सध्या कम्युनिकेशनची अनेक साधने आहेत. त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळेच उगाच टीका करणे योग्य नाही, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का, असे विचारले असता जे दिसतंय ते निश्चितच समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर गतीने पावले टाकण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या मात्र करोनामुळे सगळेच प्राधान्यक्रम बदलले आहेत. सर्व कामे थांबवावी लागली आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. दररोज प्रमुख मंडळी 14-15 तास काम करीत आहे. मी हे सारं जवळून पाहतोय, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या लेहच्या दौर्‍यात गैर काही नाही

चीनच्या मुद्यावर छेडले असता ते म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी देशाच्या राजकीय लोकांशी चर्चा केली. त्यावेळी मी स्पष्ट सांगितले, त्या व्हॅलीत तिथे भारताकडून जो रस्ता बांधला जातो, तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. पण सियाचिन आणि दुसरी एक खिंड आहे ती लष्करासाठी महत्वाची आहे. या रस्त्याहद्दल काही गैकसमज असावेत. 1993 साली भारताचा संरक्षण मंत्री असताना मी तिथे गेलो होतो. यावेळी दोन्ही बाजुंचे सैन्य मागे घेण्याबाबत माझ्या सहिचे लेखी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी हत्यार वापरणे हे लोकांच्या हिताचे आहे का याचा विचार केला पाहिजे. जागतिक दबाव चिनवर आणून यशस्वी झालो तर अधिक चांगले होईल असे मी म्हटले होते. आता सैन्यमाघार होते आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लेह चा दौरा केला त्यात गैर काहीच नाही. कारण 1962 चे युध्दा झाले तेव्हाही पंडित जवाहरलाल नेहरू तिकडे गेले होते. यशवंतराव चव्हाण साहेबही गेले होते. पंतप्रधानांनी तेच केले. दोन देशात कटुता निर्माण होते अशा वेळी सैन्याचे मनोधैर्य वाढविण्याची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायची आसते, असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, करोनाचा व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. करोनाचा विचार केला तर आता शहरातील व्यापार केंद्राचे स्थलांतर करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने व्यापार्‍यांचीही मागणी आहे. राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे. कायम स्वरुपी एक्झिबिशन सेंटर असावे असा विचार आहे. त्यासाठी महसुल विभागाला जागेची पाहणी करायला सांगितले आहे. याच व

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post