चीनविरोधी संघर्षात अमेरिकन लष्कर भारताच्या पाठीशी



माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन -  भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेचं लष्कर भारताला साथ देणार असल्याचं व्हाइट हाऊसच्या अधिकार्‍याने सांगितली आहे.

चीनसोबत युद्धाचा प्रसंग ओढवल्यास अमेरिकेचे लष्कर भारतासोबत आहे. अशा युद्धात आम्ही नेहमीच भारताच्या पाठीशी उभे राहू, असे स्पष्ट संकेत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मुख्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने दिले आहेत.

आमचा संदेश अतिशय स्पष्ट आहे. जगाच्या पाठीवर कोणतेही क्षेत्र असो, आम्ही चीनला वर्चस्व गाजवू देणार नाही. चीनचे वर्चस्व झुगारण्यासाठी आम्ही आपली पूर्ण शक्ती पणाला लावणार आहोत. अलीकडील काळात चीनने भारतासोबत जे काही केले, ते कुणीच मान्य करणार नाही. या स्थितीत भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवली, तर आम्ही भारतालाच आवश्यक ती मदत करणार आहोत, असे व्हाईट हाऊसचे संपर्क प्रमुख मार्क मीडोज यांनी फॉक्स न्यूज या वृत्तसंस्थेला सांगितले.

अमेरिकेचे लष्कर जगात शक्तिशाली आहेत आणि भविष्यातही ते शक्तिशालीच राहणार आहे. हाच संदेश आम्ही चीनला देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने आपली दोन विमानवाहू जहाज दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहेत. जगाच्या तुलनेत अमेरिकाच श्रेष्ठ आहे, अमेरिकेचे वर्चस्व कुणीही कमी करू शकत नाही आणि आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्नही कुणी करू नये. अमेरिका जागतिक महासत्ता होती, आहे आणि कायम राहील, असेही ते म्हणाले.आमचे शक्तिशाली लष्कर, हवाई दल आणि नोदल कोणत्याही कठीण प्रसंगात भारताच्या बाजूने उभे आहे, याची ग्वाही आम्ही आज भारताला देत आहोत. दक्षिण चीन समुद्रात चीनने ज्या कुरापती सुरू केलेल्या आहेत, त्या मोडीत काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्वच पावले उचलणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

आमचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनसंदर्भातील प्रशासकीय आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. यात आणखीही काही महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश असेल. आज फक्त मी इतकेच संकेत देत आहो की, हा प्रशासकीय आदेश चीनसाठी कठोर संदेश देणारा असणार आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. चर्चेनंतर दोन्ही देशांनी सीमेवरून सैन्यमाघारीस सुरुवात केली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मान्य केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दिली. डोभाल आणि वँग यांनी तणाव निवळण्याबरोबरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याची ग्वाही परस्परांना दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post