पोलिस असल्याचे सांगत महिलेचे दागिने पळविले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं,’ असं म्हणून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व एक तोळ्याचे सोन्याचे गंठण पळवून नेल्याचा प्रकार सुभेदार गल्ली परिसरात घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभेदार गल्ली परिसरातील महिला रस्त्यावरून पायी जात असताना मोटरसायकलवर दोन चोरटे आले. या दोघांपैकी एक जण हिंदीमध्ये ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं’ असं या महिलेला म्हणाला. त्यानंतर या दोघांनी महिलेला गळ्यातील सोने काढून तिच्याकडे असणार्‍या पिशवीत टाकण्यास सांगितले. महिलेने स्वतःच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व एक तोळ्याचे सोन्याचे गंठण काढून ते स्वतःच्या पिशवीत टाकण्यासाठी दिले. त्यावेळी दागिने टाकण्याचे भासवत हातचलाखी करत हे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पळून गेले.

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक विवेक पवार हे पुढील तपास करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post