कोरोनामुक्तांनी ओलांडला हजारचा टप्पा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत दररोज भर पडत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. शनिवारी 126 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर, रविवारी 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे या आजारातून बरे होणार्‍या रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनामुक्तांची संख्या 1 हजार 25 इतकी असून, ती सध्या उपचार घेणार्‍या रुग्णांच्या दुप्पट आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, हा आकडा तीन अंकी झाला आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर जनतेचीही चिंता वाढलेली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने, गावागावांत स्वत:हून बंद पाळला जात आहे. मात्र, आता या आजारातून बरे होणार्‍यांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक चित्र निर्माण होताना दिसत आहे.

रविवारी 105 रुग्ण बरे झाल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहरातील 38,  नगर तालुक्यातील 3, श्रीरामपूर येथील 22, नेवासा 3, पारनेर 10, राहाता 8, पाथर्डी 6, भिंगार 6, राहुरी 1,  संगमनेर 6, श्रीगोंदा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 25 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

रविवारी आढळले 112 नवे रुग्ण

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 45, असे 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 59 रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सकाळच्या अहवालात संगमनेर तालुक्यातील कुरण येथील 1, तर श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव 1, कोळगाव 1, अजनुज 1, देवदैठण 1 आणि घारगाव येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. तसेच सायंकाळी आलेल्या अहवालात नेवासा तालुक्यातील सोनई येथील 7 व सलाबतपूर येथील 1,  भिंगार 4, नगर तालुक्यातील सारोळा कासार 1, बुर्‍हाणनगर 4, टाकळी खतगाव 1, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी मावळा 2, चांडगाव 1,  कोळगाव 1,  घारगाव 3, आजनुज 1,  देवदैठण 1, राहुरी तालुक्यातील राहुरी बुद्रुक 1 व देवळाली प्रवरा 3, शेवगाव तालुक्यातील  वडगाव 1, कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील 1, संगमनेर तालुक्यातील राजापूर 1, मालदाड रोड 2, गणेशनगर 1, कुरण 1, नगर शहरात 5 व श्रीरामपूर 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील 1 रुग्ण बाधित आढळून आला आहे. त्यामुळे रविवारी बाधित आढळलेल्या रुग्णांसह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची एकूण संख्या संख्या 614 इतकी झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post