या बड्या मंत्र्याला कोरोनाची लागण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.

मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु असल्याचे वृत्त एक वृत्तवाहिनीने दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post