एक कोटीचा गांजा आणि 75 लाखाचे चरस जप्त



माय अहमदनगर वेब टीम
पुणे – पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल एक कोटीचा गांजा आणि 75 लाखांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्या चौघांकडे एक कोटी किमतीचे 868 किलो गांजा अंनि 75 लाख रुपये किमतीचे 7.5 किलो चरस आढळून आले आहे.

आंध्र प्रदेशातील काही दुर्गम ठिकाणांहून महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणांसाठी अंमली पदार्थ वाहतूक करणार्‍या ट्रक विषयी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पुणे सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने वाहनांचा पाठलाग केला आणि अखेर पुण्यातच त्याला अडवले. या वाहनाच्या कडक झडतीनंतर असे लक्षात आले की, वाहनाच्या छतावर तयार केलेल्या पोकळीत गांजा लपविला गेला होता आणि अंदाजे 1.04 कोटी रुपये किमतीचे 868 किलोग्राम गांजा सापडला.

दोन वाहनांपैकी दुसर्‍या गाडीतून 7.5 किलोग्राम चरस जप्त करण्यात आले. दोन्ही वाहनांचे चालक व क्लीनर अशा एकूण चार जनांना सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. ते सर्व 30 ते 35 वयोगटातील असून ते महाराष्ट्रातील आहेत. जप्तीची एकूण किंमत 2 कोटी 10 लाख रुपये आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post