अखेर इंदोरीकर महाराजांविरुद्ध ..
माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर– प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
इंदोरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील दिले होते. मात्र कारवाई होत नव्हती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कायदेशिर नोटीस बजावली की त्यामध्ये इंदोरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सह आरोपी करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून अॅड. गवांदे यांनी दिला होता.
दरम्यान ही तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीची बैठक झाली. या बैठकीत आलेल्या तक्रारी, इंदोरीकर महाराज यांचे किर्तन व्हिडीओ, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा विचार करण्यात आला. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानुसार संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याचे कागदपत्रे संगमनेरच्या प्रथम वर्ग -1 न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Post a Comment