भूमिपुत्रांनी पुढे येऊन महाराष्ट्राला उभं करावं- मुख्यमंत्री
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबवण्यात आला आहे. तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'जसे पंतप्रधान मोदीं म्हणतात आत्मनिर्भर बना, तसा महाराष्ट्र आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रीन झोनमधल्या नागरिकांनी पुढे यावे. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी इतक्या दिवस तुम्हीघरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. अजून काही दिवस घरात राहा आणि या महामारीला रोखण्यास सरकारची मदत करा.'
ग्रीन झोनमधील नागरिकांनी पुढे यावं
पुढे ते म्हणाले की,'आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावे.करोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन आपल्याला करोना विरहित ठेवणेहे आपल्यापुढचेआव्हान आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपलेघोषवाक्य आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावे.'
'31 मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असेतुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कोणाकडेच करोनाचेउत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढलेजाते. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणे हेच आपले शस्त्र आहे.लॉकडाउन वाढवणेहे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत.आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत.'
येत्या काळात अजून शिथिलता देऊत
'येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत. आजपर्यंत राज्यात 50 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. 5 लाखांच्या आसपास मजूर यामध्ये काम करत आहेत. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबलेगेलेआहे. ज्यामुळे जग थांबलेआहे. सरकारला 6 महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरेजावेलागतआहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. 40 हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ.
Post a Comment