कोरोनाच्या लढ्यात आम्हाला काम द्या ; आरएसएसने मागितली महापालिकेला कामाची जबाबदारी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याचे काम महापालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाला करावे लागत आहे. महापालिका प्रशासनाला मदत व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर एस एस) च्या स्वयंसेवकांनी महापालिका प्रशासनाला कोरोना संदर्भातील कामाची जबाबदारी द्यावी अशी विनंती आज महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना भेटून केली.

महापालिका प्रशासनाकडून शहरात करुणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे या कामाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक अविन देवकाते, शहर संघचालक वाल्मीक कुलकर्णी, शहर कार्यवाहक हिराकांत रामदासी, शिरसाट, राहुल ढवळे, यांनी महापालिकेत जाऊन महापालिका आयुक्त व महापौर यांची भेट घेतली. तसेच महापालिकेकडून आरएसएसच्या स्वयंसेवकांना जबाबदारी द्यावी अशी विनंती केली पुणे येथील रेड झोन मध्येही ही आरएसएस चे कार्यकर्ते गेली दोन महिन्यापासून येथील महापालिका प्रशासनाला मदत करीत आहेत त्याच प्रमाणे नगरमध्ये काम करण्याची इच्छा स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

अविन देवकाते म्हणाले जिल्हा प्रशासनाकडून परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते. शहरातील परप्रांतीय नागरिकांची यादी महापालिका प्रशासन देते एका प्रशासन देत असलेल्या यादीतील सुमारे 30 ते 40 जणांचा बसचा खर्च आर एस एस कडून करण्यात येणार आहे. जनकल्याण रक्तपेढी च्या माध्यमातून शहरात रक्त संकलनाचे कार्य स्वयंसेवक करत आहेत शहरात असलेल्या नागरिकांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी हे कार्य चालू आहे. महापालिका आयुक्तांकडून त्यांच्या घरातील दुःख विसरून शहरात करुणा विरुद्ध उत्कृष्ट काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त मायकलवार यांचे आर एस एस ने आभार व्यक्त केली तसेच मायकलवार यांच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चांगली काम करण्याची प्रेरणा मिळते असे देवकाते म्हणाले.

महापौर वाकळे म्हणाले आर एस एस देशातील सामाजिक कार्य करणारी अग्रणी संस्था आहे देशात येणाऱ्या संकटात नागरिकांना मदत करण्याचे कार्य आरेसेस कडून केले जातील नगरमध्येही महापालिका देत असलेल्या कोरोना विषयक लढ्यात आर एस एस मदत करू इच्छित आहे ही भूषणावह बाब आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post