गृह मंत्रालयाने म्हटले- राज्य लॉकडाउनच्या निर्बंधांना शिथिल करू शकत नाही


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा96 हजार 436 झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की,मागील 24 तासात2715 संक्रमित कोरोनामुक्त झाले. रुग्णांचा ठीक होण्याचा दर38.29% झाला आहे.दरम्यान, बीएसएफच्या आणखी 44जवानांनी कोरोनाला हरवले.आतापर्यंत 192 जवान ठीक झाले आहेत, तर 163 वर उपचार सुरू आहे.

आतापर्यंत 36 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या महिन्याच्या पहिल्या तारखेला जवळपास इतकेच (37 हजार 262) संक्रमित होते. आता एकूण 55 हजार 872 रुग्णांवर उपाचर सुरू आहे. तर 3025 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिल्लीत 299, राजस्थानमध्ये 140, कर्नाटकात 84, आंध्रप्रदेशात 52, ओडिशात 48, बिहारमध्ये 6, तर आसाम, हरियाणा आणि गोवामध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. याआधी रविवारी देशात सर्वाधिक 5015 रुग्ण सापडले तर 2538 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लॉकडाउन-4 मध्ये लावलेले नियम शिथिल करू शकत नाहीत.ते स्थानिक परिस्थितिचा आढावा घेऊनआरोग्य विभागाच्या दिशा-निर्देशांप्रमाणे अजून कडक करू शकतात.

रविवारी सर्वाधिक 5015 रुग्ण आढळले
महाराष्ट्रात एका दिवसात 2347 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार पार झाली आहे. यातील 20 हजार एकट्या मुंबईतील आहेत. याशिवाय गुजरात आणि तमिळनाडूत संक्रमितांची संख्या प्रत्येकी 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.मागील 24 तासांत तमिळनाडूत 639, दिल्लीत 422, गुजरातमध्ये 391, राजस्थानात 242, उत्तरप्रदेशात 206, मध्यप्रदेशात 187, पश्चिम बंगालमध्ये 101, बिहारमध्ये 106, ओडिशाात 91, जम्मू-कश्मीरमध्ये 62 आणि कर्नाटकात 55 नवीन रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 95 हजार 169 संक्रमित आहेत. 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरू असून 36 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशात 3029 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती भवनात पोहचला कोरोना
दिल्ली पोलिसांनुसार, राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या एका 58 वर्षीय एसीपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते राष्ट्रपती भवनाच्या पोलिस लाईनमध्ये तैनात होते. 13 मे रोजी एसीपीसह पाच पोलिसांची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर सर्व पोलिस क्वारंटाईनमध्ये होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post