ढवारा मटणाची अविस्मरणीय चव आणि दोन भावांचा संघर्षमय प्रवास
विकास चोभे :
नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद – हिवरे झरे परिसरात आज जेव्हा कोणी "चांगलं जेवण कुठे मिळेल?" असं विचारतं, तेव्हा एकच नाव कानावर येतं – हॉटेल विजयराज.
आज हजारो खवय्यांच्या जिभेवर राज्य करणाऱ्या या हॉटेलामागे आहे विजयशेठ वाळके आणि राजेंद्रशेठ वाळके या दोन भावांची अथक मेहनत, चिकाटी आणि संघर्षाची कहाणी.
संघर्षाची सुरुवात – कष्टांचा पाया
18 जुलै 2017 रोजी विजयशेठ आणि राजेंद्रशेठ वाळके या दोन्ही बंधूनी हॉटेल विजयराज चा श्री गणेशा केला. ज्या वेळी या दोघांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला, त्यावेळी हातात भांडवल नव्हतं, आधार नव्हता, पाठबळ नव्हतं. फक्त स्वप्न होतं – खवय्यांना खरी, चविष्ट आणि प्रामाणिक सेवा द्यायची. त्यासाठी त्यांनी दिवस-रात्र परिश्रम केले. थंडी-उन्हाची पर्वा न करता, ग्राहकांसाठी हसतमुखाने सेवा देत राहिले. "ग्राहक देव आहे" – हा विचार त्यांनी मनाशी घट्ट धरला आणि त्याच विचारावर आपला व्यवसाय उभा केला. आई वडिलांचा आशीर्वाद घेत ग्राहकांचे हित जपण्यासाठी दोघांनीही प्राधान्य दिले.
चव आणि सेवेतून घडलेलं नाव
चिकन-मटन थाळी असो, उक्कड असो, बिर्याणी असो किंवा व्हेज मराठा – प्रत्येक पदार्थात त्यांनी मनापासून केलेल्या कष्टांचा सुगंध आहे. पण जेव्हा ढवारा मटण स्पेशल ची वेळ येते, तेव्हा खवय्यांचा जीव की प्राण विजयराजकडेच धाव घेतो.
नगर तालुक्यात आता एकच वाक्य सर्वत्र ऐकू येतं –
👉 "नगरमध्ये कुठेच नाही ती चव, फक्त हॉटेल विजयराजमध्येच!"
कुटुंबासारखी टीम – यशाचं रहस्य
हॉटेल म्हणजे फक्त भिंती आणि टेबल-खुर्च्या नव्हेत. तेथे सेवा करणारा स्टाफ, वस्ताद, वेटर – हे सगळेच कुटुंबाचा भाग आहेत.
विजयशेठ आणि राजेंद्रशेठ यांच्यासाठी हे लोक कामगार नाहीत, तर आपलेच माणसं आहेत. हाच आपुलकीचा भाव ग्राहकांपर्यंत पोहोचतो, आणि त्यामुळे जेवणाची चव आणखी खुलते. या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्यासाठी येथील वेटरही तत्पर असतात.
गावागावांचा आधार, आपुलकीचा ओलावा
आज वाळकी, देवळगाव सिद्धी, बाबुर्डी बेंद, खडकी, हिवरे झरे, सारोळा, घोसपुरी, जळवाडी, गुंडेगाव, जाधववाडी, अकोळनेर या सर्व गावांसाठी हॉटेल विजयराज हे हक्काचं ठिकाण बनलं आहे.
फक्त जेवणाचं नाही, तर लोकांच्या मनातल्या आपुलकीचं, विश्वासाचं आणि चवीच्या आठवणींचं. हॉटेल मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी दोन्ही बंधू आपुलकीने चौकशी करतात. प्रत्येकाशी कौटुंबिक स्नेह जपतात. सुख दुःखात सहभागी असतात. एकदा हॉटेवर जेवणारा माणूस पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचं हसतमुख, मनोभावे होणारे स्वागत हेच हॉटेल विजयराज च्या यशाचे मुख्य कारण मानले जाते. येथे येणारा प्रत्येक जण जेवण झाल्यानंतर शेठ जेवण एक नंबर बरका.. अशी कौतुकाची थाप देऊनच जातो..
संघर्षातून उभारलेलं यश
गेल्या आठ-नऊ वर्षांत दोन्ही भावांनी सिद्ध करून दाखवलं –
👉 "यश पैशावर उभं राहत नाही, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी असलेला जिव्हाळा यावर उभं राहतं."त्यांच्या प्रवासाकडे पाहिलं की असं वाटतं – हा केवळ हॉटेल व्यवसाय नाही, तर संघर्षावर मात करून उभं राहिलेलं स्वप्न आहे.
खासदार, आमदार, अधिकारी आणि नगरकरांना विजयराज ची भुरळ
पंचक्रोशीत हॉटेल विजयराज च्या चवीला तोड नाही. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार, खासदार, अहिल्यानगरकरही हॉटेल विजयराजच्या चवीचा आस्वाद घेत आहेत. एकदा आलेला ग्राहक येथे पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहत नाही.
स्पेशल चुलीवरचं मटण अन भाकरी
अल्पवाधितच हॉटेल विजयराज चे नाव नावारूपाला आले आहे. प्रत्येक ग्राहकाची आवड निवड जपण्याची काम येथे होते. स्पेशल चुलीवरचं मटण अन भाकरी फेमस आहे. व्हेज खाणाऱ्यांसाठी शेवगा हंडी फेमस आहे.
वीट सप्लायर्समध्ये बसवला जम
गेल्या दहा वर्षांपासून हॉटेल विजयराजचे संचालक विजयशेठ वाळके हे नगर तालुक्यात वीट सप्लायर्स करतात. अत्यंत योग्य आणि खात्रीशीर वीट मिळत असल्याने नगर तालुक्यातील प्रत्येक गावातून त्यांच्याकडे वीट ची मागणी होत आहे. हॉटेल व्यवसाय व वीट सप्लायर्स हे दोन्ही व्यवसाय प्रामाणिकपणे मेहनतीने करत असल्यामुळे पंचक्रोशीत विजयशेठ यांचे नाव नावारूपाला आले आहे.
🔥 म्हणूनच, ढवारा मटणाची खरी चव अनुभवायची असेल, तर जीवनात एकदा तरी हॉटेल विजयराजला भेट दिल्याशिवाय राहू नका! 🔥
Post a Comment