माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या अद्वितीय गाथेला उजाळा देत खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आपला मावळा संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय गड-किल्ले बनवा स्पर्धा-दिवाळी २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा एक सर्जनशील व्यासपीठ ठरणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच शिवराज्याच्या इतिहासाशी, परंपरेशी आणि सर्जनशीलतेशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
विषय : आपल्या कल्पनेतील गड-किल्ला
स्पर्धकांनी स्वतः तयार केलेल्या गड-किल्ल्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेचे दर्शन घडवायचं आहे. किल्ले सादरीकरणाची तारीख २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
वयोगटानुसार दोन गट
लहान गट ४ ते १५ वर्षे : आकार सुमारे २ बाय २ बाय १.५ फूट
ज्येष्ठ गट १५ वर्षांवरील : आकार ५ बाय ५ बाय ३ फूट
स्पर्धकांनी नैसर्गिक व पर्यावरणपूकर साहित्याचा वापर अनिवार्यपणे करावा, असा पर्यावरणपूरक संदेशही आयोजकांनी दिला आहे.
सहभाग पध्दत
आपला मावळा समिती प्रत्यक्ष पाहणी करून गुणदान करेल. तर दूरच्या स्पर्धकांसाठी १ ते २ मिनिटांचा व्हिडीओ आणि ५ स्पष्ट छायाचित्रे ईमेलद्वारे aaplamavla@gmail.com वर पाठविण्याची सुविधा आहे.
सादरीकरणाचा पत्ता
खा. नीलेश लंके संपर्क कार्यालय, ईगल प्राईड बिल्डिंग, चाणक्य चौकाजवळ, अहिल्यानगर ४१४००१ खा. नीलेश लंके संपर्क कार्यालय, समर्थ कॉम्प्लेक्स, पारनेर-सुपा रोड, पारनेर ४१४३०२
विजेत्यांसाठी पारितोषिके
प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र अशी त्रिस्तरीय पारितोषिक रचना आहे. प्रथम क्रमांकास १० हजार ३३३ रूपये, व्दितीय क्रमांकास ७ हजार ३३३ रूपये, तृतीय क्रमांकास ५ हजार ३३३ रूपये, चतुर्थ क्रमांकास ३ हजार ३३३ रूपये तर उत्तेजनार्थ २ हजार ३३३ रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना खा. नीलेश लंके यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिवाय सर्वात पर्यावरणपूरक गड-किल्ला व सर्वात अचूक ऐतिहासिक प्रसंगावर आधारित गड-किल्ला या दोन विशेष परितोषिकांचाही समावेश आहे.
स्पर्धेच्या अटी
गड-किल्ला स्वतः तयार केलेला असावा, थर्माकोल, प्लास्टिक यांसारख्या अपारंपारिक व पर्यावरणहानीकारक वस्तूंचा वापर निषिद्ध, शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेचे स्पष्ट दर्शन आवश्यक, दूरस्थ सहभागासाठी व्हिडीओत सर्व बाजू दाखविणे बंधनकारक, अंतिम सादरीकरण २ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील स्पर्धकांना सहभाग घेण्याची संधी. इतिहास, स्थापत्य, पर्यावरण व कला क्षेत्रातील तज्ञांचा परिक्षक मंडळात समावेश असेल. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी ९४२२४५८४६२ व ९६३७९४३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
परंपरेचा सन्मान, पर्यावरणाचा विचार
या स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील नव्या पिढीला स्वराज्याचा अभिमान, पराक्रमाची जाणीव आणि सृजनशीलतेचा संगम साधण्याची संधी मिळणार आहे. खा. नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपला मावळा चा हा उपक्रम परंपरेचा सन्मान आणि पर्यावरणाचा विचार यांचा सुंदर संगम ठरणार आहे.
Post a Comment