भाजप नेत्यांचे घरासमोर ‘महाराष्ट्र बचाव’


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – करोना संकटाशी मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारविरोधात शुक्रवारी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपापल्या घराच्या अंगणात काळ्या फिती लावून ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले.

लोणी येथे माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, चेअरमन नंदूशेठ राठी , सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे आदी आंदोलनात सहभागी झाले. तर श्रीगोंदा येथे आ.बबनराव पाचपुते, चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडाला राज्यातील भाजप नेत्यांनी आर्थिक मदत केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री मदत निधीला अद्याप मदत केलेली नाही. भाजपकडून मुख्यमंत्री फंडात निधी कधी दिला जाणार, याकडे जनतेचे लक्ष आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post