मोठ्या हॉस्पिटलमधील 4400 बेड रिजर्व



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी राज्यात नवीन 2,345 रुग्णांची नोंद झाली. यासोबतच राज्यातील राज्यातील आकडा 41,642 झाला असून, काल राज्यात 64 रुग्णांचा मृत्यू झाला. यात एकट्या मुंबईतील 41 रुग्ण आहेत. यासोबतच राज्यातील बळींची संख्या 1,454 झाली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व मोठ्या हॉस्पिटलमधील बेड रिजर्व केले
सरकारने गुरुवारी रात्री एक नोटिफिकेशन जारी करुन राज्यातील प्रायवेट हॉस्पिटल आणि नर्सिंग होममधील 80% पेक्षा जास्त बेड रिजर्व केले आहेत. आता सरकारकडे 4400 खाटांची व्यवस्था आहे. राज्य सरकारने या हॉस्पीटलमधील उपचारासाठी फीसदेखील ठराविक केली आहे. यात धर्मादं ट्रस्टचे हॉस्पीटलदेखील सामील आहेत. सरकारने बेड रिजर्व केलेल्या हॉस्पीटलमध्ये एचएन रिलायंस, लीलावती, ब्रीच कँडी, जसलोक, बॉम्बे हॉस्पिटल, भाटिया, वॉकहार्ट, नानावती, फोर्टिस, एलएच हीरानंदानी आणि पीडी हिंदुजा हॉस्पिटल सामील आहेत.
सध्या राज्यात सामान्यांसाठी ट्रेन सुरू होणार नाही
गुरुवारपासून सामान्यांसाठी 200 ट्रेन्सची बुकिंग सुरू झाली आहे, पण महाराष्ट्रातील नागरिकांना ट्रेन प्रवासासाठी वाट पाहावी लागणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर महाराष्ट्रातील प्रवासाला ब्लॉक करण्यात आले आहे. रेल्वेनुसार, राज्य सरकारच्या निर्णयानंतरच असे करण्यात आले आहे.
अर्ध्या क्षमतेसोबत मेट्रो चालवण्यास परवानगी
मुंबई मेट्रोने ट्रेन्स सुरू करण्यासाठी प्रोटोकॉल तयार करने सुरू केले आहे. गुरुवारी मुंबई मेट्रोने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर आपल्या ट्रेनचे फोटो जारी केले. फोटोत दिसले की, ट्रेनमधील सीटवर एक सीट सोडून स्टिकर लावण्यात आले आहे. याच्या 16 रॅकवर बसण्याची व्यवस्था आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. सध्या मेट्रो कोचमध्ये बसण्याची क्षमता 200 आहे, तर इकप 200 लोक उभे राहून प्रवास करू शकतात. पण, आता नव्या व्यवस्थेनुसार अर्ध्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. म्हणजेच 100 प्रवासी बसू शकणार, तर 75 उभे राहून प्रवास करू शकतील.
दोन दिवसात 5 पोलिसांचा मृत्यू
कोरोनामुळे महाराष्ट्रात 2 दिवसात 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी एका एएसआयचा मृत्यू झाला. पुण्यातही एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दोघेही मागील काही दिवसांपासून सुट्टीवर होते. ठाण्यात 45 वर्षीय महिला पोलिसाचा मृत्यू झाला.
रेड आणि कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त अनेक भागात बस सेवा सुरू होणार
सरकारने शुक्रवारी काही अटी-शर्तींनी रेड आणि कोविड-19 कंटेनमेंट भाग सोडून, जिल्ह्यांतर्गत बस सेवेला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळ (एमएसआरटीसी) ने गुरुवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली.

रुग्णांचा तपशील :
मुंबई मनपा २५५००, ठाणे ३३८, ठाणे मनपा २०४८, नवी मुंबई १६६८, कल्याण -डोंबिवली ६४१, उल्हासनगर १३१, भिवंडी-निजामपूर ८०, मीरा-भाईंदर ३६२, पालघर १०२, वसई -विरार ४२५, रायगड २८५, पनवेल २७१, नाशिक मंडळ १४२५, पुणे मंडळ ५३७१, कोल्हापूर मंडळ ३५७, औरंगाबाद मंडळ १२९७, लातूर मंडळ १७८, अकोला मंडळ ६४१, नागपूर ४७४, इतर राज्ये ४८.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post