दर्जेदार बियाणे व खत शेतकऱ्यांच्या बांधावर- कृषी मंत्री दादा भुसे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- यापूर्वी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून लॉक डाऊन च्या काळामध्ये थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविणे शक्य झाले त्याच धर्तीवर दर्जेदार बियाणे व दर्जेदार खते रास्त किमतीत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवणे हे काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व दर्जेदार खते मिळणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
नुकतेच अहमदनगर येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बांधावर खत वाटप कार्यक्रमा अंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपनीला खत वाटप कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप शरद गीते उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे रवींद्र माळी सूर्यकांत शेकडे आर एम गोसावी विजय सोमवंशी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी चे सदस्य उपस्थित होते
भुसे पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे शेतकऱ्यांना कुठलीही खताची टंचाई येणार नाही एका गुणी मागे शेतकऱ्याचे दहा ते वीस रुपये वाचणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा कोरोना च मोठं संकट आज सर्वांसमोर आहे त्यात शेतकरीही चुकला नाही शेतकऱ्यांची अडवणूक आणि खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बियाणे आणि खते कमी पडणार नाही याचं नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रात सर्व कार्यालयांमध्ये शेतकरी संवाद कक्ष स्थापन केलेला आहे खरा शास्त्रज्ञ हा शेतकरीच आहे शास्त्रज्ञा पासून ते कृषिसेवक का पर्यंत सर्वांनी शेतकऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधला पाहिजे एखादा छोटा शेतकरी असे प्रयोग करतो की ते मोठ्या शास्त्रज्ञाला सुद्धा जमणार नाही त्यामुळे त्या छोट्या-छोट्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजेत त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते अशा शेतकऱ्यांची एक रिसोर्स बँक तयार करण्यासाठीच कामकाज चालू असल्याचे यावेळी ते म्हणाले
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप म्हणाले कोरोना पार्श्वभूमीवर विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटप करण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांकडून कुठलाही वाहतूक खर्च घेतला जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचे दहा ते वीस रुपये वाचणार असून त्यांना ग्रामीण भागातून शहरात येण्याची गरज नाही शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी बचत गट यांच्या माध्यमातून खत वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी सुद्धा जेवढे आवश्यक असेल तेवढेच खत घ्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले
प्रगती कृषी गट लिंबळक विलास लामखडे समीर पटेल, गोसावी बाबा कृषी गट इसळक भाऊसाहेब गायकवाड, पोपट गाडगे, जय मातादी शेतकरी गट खारे कर्जुने दत्तात्रेय शेळके, विकास निमसे यांना याप्रसंगी वाटप करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post