भाजी मार्केट बाजार समितीमध्ये पूर्ववत चालू करणार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कै.दादापाटील शेळके कृ.उ.बा.स. मुख्य भाजी मार्केट बाजार समितीमध्ये पूर्ववत चालू करणार असे आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे भाजीपाला-फळे-कांदा-बटाटा असोसिएशनला आश्वासन.

भाजी मार्केट मुख्य बाजार समिती कोठी रोड आवारात भाजीपाला मार्केट चालू करणेबाबत असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्या संयुक्त चर्चेमध्ये असे ठरविण्यात आले आहे, की कोठी रोड येथील भोजीपाला मार्केट प्रशासकीय परवानगी घेऊन लवकरात लवकर सर्व नियमांचे पालन करून भाजीपाला-फळे-फुले इत्यादींचा ठोक व्यापार चालू करून देण्याचे आश्वासन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आज दिले आहे. तसेच मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्याशी केलेल्या चर्चेच्या माध्यमातून सर्व अडतदार व व्यवसायिक यांना आश्वस्त करण्यात येते, की जुन्या बाजार समितीच्या आवारामध्येच पुढील व्यवसाय सुरू करण्यात येईल. त्यामुळे सर्व अडतदार व व्यवसायिक यांनी काळजी व हतबल न होता येणाऱ्या निर्णयाची प्रतिक्षा करावी, असे आश्वासन दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post