आमदार शिवाजीराव कर्डीले : जनतेसाठी आयुष्य समर्पित करणारा नेता...!



भाजप तालुकाध्यक्ष दीपक कार्ले यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

विकास चोभे : 

जनतेच्या सेवेसाठी आयुष्य पणाला लावणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा, “मी शिवाजीराव कर्डिले बोलतोय” या एका वाक्याने हजारोंच्या मनात विश्वास निर्माण करणारा नेता  आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आजही जनतेच्या हृदयात जिवंत आहेत. सत्तेपेक्षा सेवा, पदापेक्षा माणुसकी आणि राजकारणापेक्षा जनतेचे हित हेच त्यांचे जीवनमंत्र होते. थोर नेतृत्व, तीव्र जनसंपर्क, आणि करारी निर्णयक्षमता यांच्या बळावर त्यांनी नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघाला, नगर तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेले. आयुष्यभर जनतेसाठी लढलेले हे जननायक आजही लोकांच्या आठवणींमध्ये न्याय, प्रेम आणि प्रेरणेचा शाश्वत झरा बनून वाहत आहेत.



आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब नगर तालुक्याचे आमदार होते. त्यावेळी वडिल पोपटराव कार्ले 2000 ते 2005 पर्यंत खंडाळा गावचे सरंपच होते. साहेबांची आणि वडिलांची घनिष्ट मैत्री होती. साहेबांचे नेहमी घरी येणे जाणे असत. घरी आल्यानंतर साहेबांच्या आणि वडिलांच्या विविध विषयांवर गप्पा गोष्टी व्हायच्या. त्यामुळे आमच्या कुटुंबियांचे आणि साहेबांचे ऋणानुबंध घट्ट जुळले होते. नगर तालुका विधानसभा मतदारसंघाचे त्रिभाजन झाल्यानंतर कर्डिले साहेबांनी नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघातून विधानसभा लढवली. कर्डिले साहेबांची राजकारण आणि समाजकारणाची हातोटी जवळून पाहिली होती. त्यातुन समाजकारण आणि राजकारणाची आवड निर्माण झाली. गावात समाजकारणात माझी नेहमी अग्रेसर भूमिका राहत असतं. 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल घेत नगर तालुकाध्यक्ष पदी निवड केली. पदाच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी कामे केली. वडिलांनंतर पत्नी स्वाती ग्रामपंचाय सदस्य झाली. साहेबांसोबत कौटुंबिक सलोखा असल्यामुळे भाजपकउून पंचायत समिती निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यात यश आले. 2022 मध्ये साहेबांनीच भाजप नगर तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली. तेव्हापासूनच माझ्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रामाणिकपणे साहेबांनी दिलेली जबाबदारी पार पाडली. संधीचे सोने केले. साहेबांनी केवळ राजकीय पाठबळच दिले नाही तर व्यावसायिक दृष्ट्याही वारंवार मार्गदर्शन केले. हॉटेल मयुरी नावाने हॉटेल व्यावसाय असल्यामुळे साहेबांनी अनेक वेळा हॉटेलला भेट दिली. व्यावसायात काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले. चुलते गुलाबराव कार्ले यांनाही साहेबांनी नगर तालुका दूध संघावर संचालकपदाची संधी दिली. कौटुंबिक स्नेह असल्यामुळे आम्हाला सपत्नीक साहेबांसोबत देवदर्शन करण्याचा योग आला.



मी शिवाजीराव कर्डिले बोलतोय...

आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि वडिल पोपटराव कार्ले यांची मैत्रीचे संबंध होते. नेहमी घरी येणे जाणे असल्याने कर्डिले साहेबांना जवळून पाहिले आणि अनुभवले होते. भावा भावाचे वाद असोत की भावकीतील वाद असोत, पती पत्नीचे वाद असोत, कोणत्याही प्रकारणे वाद, प्रश्न लोक साहेबांना सांगत असतं. आणि साहेबही ते अत्यंत चाणाक्षपणे सोडवत. न होणारे कामही साहेबांच्या दरबारात आल्यानंतर झालेली अनेक उदाहरणे पाहिलीत. कोणेी समस्या घेऊन आला की साहेबही त्या समस्येच्या मुळाशी जात होते. आज करतो, उद्या करतो, नंतर करतो असे सांगणे त्यांना कधीच जमले नाही. जे आहे ते लगेच. समोर कोण अधिकारी आहे, कोण आहे त्याला लगेच फोन लावणार आणि मी शिवाजीराव कर्डिले बोलतोय... नाव ऐताच अनेक जण उठून उभे राहिलेले आम्ही पाहिलेय. तो माझा माणूस आहे. त्याचे काम झाले पाहिजे... असे संबंधिताला दरडावून सांगणारा नेता म्हणजे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब.... काम करण्याची पद्धत आणि काम करुन घेण्याची पद्धत साहेबांची वेगळीच होती.. काम झाल्यानंतर पुढारी माझ्यासोबत राहतील की नाही माहित नाही पण जनता माझ्या सोबत कायम राहिले असे ते नेहमी म्हणतं. समस्या घेऊन जाणाऱ्याला कोणाच्या शिफारशीची गरज कधीच लागत नव्हती. म्हणूनच सामान्य माणूनसही साहेबांना थेट येऊन भेटायचा. 30-35 वर्षांपासून सुरु झालेला जनता दरबार आजही अविरतपणे सुरु आहे. रोज शेकडो प्रश्न आजही साहेब सोडवत होते. रात्री बेरात्रीही लोक हक्काने फोन करायचे.. नगर तालुक्यातील जनतेसाठी साहेब वरदानच होते.



कर्डिले साहेब नगर तालुक्याचे सुप्रिम कोर्ट

आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची मैत्री ही लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत होती. गावात आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांना ओढ असायची. प्रत्येकाची ते आपुलकीने चौकशी करायचे. जनता दरबारमधून अनेकांना जागच्या जागेवर न्याय मिळवून द्यायचे. अनेक प्रतिष्ठीन कुटुंबातील टोकाचे वादही त्यांनी सलोख्याने सोडविले. साहेबांच्या दरबारात (कोर्टात) तारीख पे तारीख कधीच नव्हती. फैसला ऑन दी स्पॉट असायचा. त्यामुळे कर्डिले साहेब नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघाचे नगर तालुक्याचे एक कुटुंब प्रमुखच होते. नगर तालुक्याचे ते सुप्रिम कोर्टच होते. जवळचा एखांदा कार्यकर्ता चुकला तर त्यालाही खडेबोत सुनावयाचे. राजकारणात विरोधात असलेला जरी जनता दरबारमध्ये आला तरी साहेब त्याचे काम करुन द्यायचे. राजकारणा पुरते राजकारण आणि निवडणुका संपल्या की पक्षविरहित लोकांची कामे करायची. रंजल्या गांजलेल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांना वेडच लागले होते. मतदारसंघाच्या, तालुक्याच्या बाहेर असले की त्यांना मी माझ्या माणसांत कधी जाईल असे वाटायचे.



जनतेसाठी आयुष्य पणाला...

दूधवाला, सरपंच, भाजपा नेते, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार, माजी मंत्री, राजकारणातील पहिलवान, राजकारणातील मास्टरमाईंड, बॉस अशा अनेक नावांनी कर्डिले साहेबांची ओळख होती. अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणा छाप पाडली होती. त्यामुळेच साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये होते. फडणवीस साहेबांचेही कर्डिले साहेबांवर विशेष प्रेम होते. साहेबांनी 1995 ला पहिली विधानसभा निवडणूक लढविली. आणि दणदणीत विजय मिळविला. तेव्हापासून त्यांनी मागे पाहिलेच नाही. विकासकामांचा सपाटा, विकासाचा आलेख उंचावतच ठेवला. जनता दरबारातून अनेकांची कामे केली. माणसे जोडली. कार्यकर्त्यांना ताकद दिली. पक्ष संघटना वाढविली. त्यातून वेगळी छबी निर्माण केली. 27 मे 2025 रोजी नगर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी साहेबांवर मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये मणक्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाल्याचे साहेबांना समजले. त्यावेळी साहेबांना डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्यास सांगितले असतांनाही त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सोबत घेत दुसऱ्याच दिवशी अकोळनेर, सारोळा कासार, खडकी, वाळकी या गावांचा दौरा केला. अतिवृष्टी ग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले. स्वतःच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करुन जनतेच्या सुख दुखात नेहमीच त्याची तळमळ असायची. कुटुंबापेक्षाही लोकांना त्यांनी जास्त वेळ दिला. अहोरात्र जनतेच्या सुखदुखात राहिले. जनतेसाठी आयुष्य पणाले लावले.



मंत्री पदाची इच्छा अपूर्ण राहिली

शिवाजीराव कर्डिल साहेबांचा राजकीय संघर्षमय प्रवास आम्ही जवळून पाहिलाय. दूधवाला, सरपंच ते आमदार आणि मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. कर्डिले साहेबांनी मला मंत्रीपद नको पण माझ्या मतदारसंघातीन जनतेला पाणी द्या असे म्हणून मंत्री पद सोडल्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. त्यावेळी त्यांनी घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतल्या. त्यामुळे नगर तालुक्यातील माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरून 80 टक्के गावांना पिण्याच्या पाण्याची सोय झालीय. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साहेब सहाव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नंतर सिनेरिटीमध्ये शिवाजीराव कर्डिले  साहेबच होते. आपल्या जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील असे सर्वांनाच वाटत होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर कर्डिलेसाहेबच सिनियर असल्यामुळे साहेबांना मंत्रीपद हमखास मिळेल असे वाटत होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दुसऱ्यांना मंत्री होण्याची संधी अपूर्ण राहिली.

मला मंत्री पद नको पण माझ्या मतदारसंघाचा विकास करा

अपक्ष निवडून आल्यानंतर कर्डिले साहेबांना मंत्री पदाची संधी होती. परंत त्यांनी तसेच न करता मंत्रीपदाच्या बदल्यात घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुर करुन घेतल्या. आणि महिलांच्य डोक्यावरील हंडा उतरविला. जिल्हा सहकारी बँकेत भाजपाचे केवळ सहाच संचालक असतांनाही पवारांच्या ताब्यातील जिल्हा बँकेवर आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या रुपाने पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला. अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजपचे 14 नगरसेवक निवडणून आले होते. परंतु, महापलिकेवर भाजपचा महापौर करायचा होता. त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर सोपवली होती. केवळ 14 नगरसेवकांच्या जोरावर कर्डिले साहेबांनी महानगरपालिकेवर भाजपचा महापौर करुन किमया केली. संख्याबळ नसतांनाही जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा, महापालिकेवर महापौर करुन दाखविला. त्यामुळे कर्डिले साहेबांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये नोंद होती.



कर्डिले साहेबांना अक्षयदादांना आमदार म्हणून पहायचं होत

गेल्या 30-35 वर्षांपासून आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेचे लोकप्रतिनिधीत्व केले. जनेसाठी अहोरात्र झटले. आजारपणातही जनतेची सेवा त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. आजारपणातही त्यांनी अतिवृष्टीच्या काळात मतदारसंघात दौरे केले. नगर तालुक्यात दौरे केले. आजारपणात साहेबांच्या पश्चात चिरंजीव भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांनी जनता दरबारची धुरा यशस्वीपणे सांभाळली. अतिवृष्टीच्या काळात गावोगावी दौरा करत पुरग्रस्तांना आधार दिला. हळूहळू अक्षयदादा साहेबांची सर्वच जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे साहेबांनीही अक्षयदादांना आमदार करण्याचे ठरवलं होते. परंतु, शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या आकस्मान निधनाने अक्षयदादांना आमदार म्हणून पहायचं स्वप्न अधुर राहिलं. परंतु, साहेबांवर प्रेम करणारी जनता आजही अक्षयदादांच्या पाठिशी ठामपणे उभी असून अक्षयदादांना आमदार करुनच कर्डिले साहेबांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. हीच आम्हा सर्व निष्ठावंतांच्या दृष्टीने कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली असेल.

दीपक कार्ले

तालुकाध्यक्ष, भाजप, अहिल्यानगर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post