श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे स्टडी फ्रॉम होम


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे, त्यामुळे सर्वत्र बंद असल्याने शाळा, कॉलेजही बंद आहेत. शासनाने माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वार्षिक परिक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्वच विद्यार्थी घरीच आहेत. बंद कालावधी कधी संपेल हे सांगता येत नाही, त्यामुळे नगरमधील श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये म्हणून स्टडी फ्रॉम होम सुरु केलेले आहे.

स्टडी फ्रॉम होम अंतर्गत हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॅटस्अप ग्रुप तयार करण्यात आलेला असून, सदर ग्रुपवर शालेय अभ्यास देणे, यु-ट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ डाऊनलोड करुन ते विद्यार्थ्यांना पाठविणे, दिक्षा अ‍ॅपचा वापर, अभ्यासमाला, विविध ग्रुपवर येणार्‍या शैक्षणिक पीडीएफ, ऑनलाईन टेस्ट, वगैरे बाबींचा वापर करण्यात येतो. शिवाय शिक्षक आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर संपर्क साधून त्यांना अभ्यासाबाबत सूचना देत आहेत. या बाबतचा मुख्याध्यापिका सौ.कांचन गावडे या हायस्कूलमधील सर्व शिक्षकांशी संपर्क साधून आढावा घेत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना फोन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत आहेत.

मुख्याध्यापिका कांचन गावडे यांनी शासन निर्देशानुसार पुढाकार घेत शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्टी फ्रॉम होम सुरु करण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून अभ्यासक्रमाबाबत सूचना केल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन विषयावर शिकवणे सुरु केले आहे. विद्यार्थीही आनंदाने घरीच सराव करुन शिक्षकांकडून शंकांचे निरसन करुन घेत आहेत.

या उपक्रमास संस्थेचे चेअरमन शांतीलाल गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सेक्रेटरी र.धों.कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड. विजय मुनोत व सर्व विश्‍वस्त यांनी कौतुक केले असून, हायस्कूलमधील सर्व शिक्षक दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करीत आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार शासनाकडून मिळालेला तांदूळ इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post