अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत बंद


या कालावधीत नागरिकांच्या हालचालींवरही निर्बंध लागू

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्‍हयातील नागरी व ग्रामीण भागातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्‍यावश्‍यक सेवा, कार्यालये, आस्‍थापना वगळून इतर सर्व दुकाने दिनांक १७ मे, २०२० रोजी पर्यंत संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच या कालावधीत उपरोक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा वगळून इतर कामांसाठी व्‍यक्‍तीच्‍या हालचालीवर निर्बंध असल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. असल्‍याबाबत आदेशीत करीत आहे.

ज्‍याअर्थी, राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार, श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणेकामी प्रतिबंधात्‍मक आदेश पारित करण्‍यात आलेले आहेत. नागरिकांची अनावश्‍यक गर्दी टाळण्‍यासाठी जिल्‍हयातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, एटीएम इ. वगळता सर्व दुकाने संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्तीच्‍या हालचालीवरही या कालावधीत निर्बंध लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post