दारू घेण्यासाठी नागरिकांच्या भर उन्हात रांगा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली. तर अनेक दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी रात्री फिजिकल डिस्टन्सिंगची आखणी करण्यात आली. रात्रभर नगर शहरात हे काम सुरू होते. दुकान मालक जातीने लक्ष देऊन त्यांनी ही आखणी करून घेतली. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच मद्यप्रेमी दुकानांभोवती घुटमळत उभे होते. सकाळी नऊ वाजता ही गर्दी वाढली. दिलेल्या चौकोनात अनेक उभे होते. हे चौकोनही अपुरे पडले. भर उन्हातही दारू घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post