महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 13 हजाराजवळ


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. राज्यात रविवारी 678 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 12 हजार 974 झाली आहे. रविवारी 27 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा 548 वर गेला आहे. रविवारी 115 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आजपुण्यात कोरोनामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेलाआहे. 58 वर्षीय पोलिस कर्माचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून ते आयसीयूत होते.याआधी मुंबईत कोरोनामुळे 4 पोलिसांचा दुर्दैवीमृत्यू झालेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 2 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कालपासून जिल्ह्यात 4 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून रत्नागिरीतील रुग्णांची संख्या 10 वर पोहचलीआहे.मुंबईहुन आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे रुग्ण मुंबईहून मंडणगडमध्ये चालत आले होते. यात एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुरुष रुग्ण हा मंडणगडमधील तिढे गावातील आहे. तर महिला रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील पूर मधील आहे. हि महिला संगमेश्वर येथे पतीच्या अंत्यसंस्काराला आली होती. यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

मुंबई मनपा ८८००, ठाणे ५४८, मुंबई-ठाणे मंडळ मिळून १०२२३, नाशिक मंडळ ४१३, पुणे मंडळ १५४९, कोल्हापूर मंडळ ६१, औरंगाबाद मंडळ २९७, लातूर मंडळ ४७, अकोला मंडळ १९८, नागपूर १५८, इतर राज्ये २८.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post