'त्या' कोरोना पॉझिटीव्ह महीलेने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. मुंबईहून नगर तालूक्यातील निंबळक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post