अहमदनगरमध्ये कोरोना बधितांची संख्या शतकाजवळ


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात आज आणखी 5 कोरोना बाधित व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 99 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी, खोकला किंवा इतर आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये 54 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या 5 व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर येथून टाकळीमिया राहुरी येथे आलेली 35 वर्षीय महिला, भिवंडी येथून नगर शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव अकोले येथे आलेली 66 वर्षीय महिला आणि राहता तालुक्यातील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2153 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून त्यापैकी 2011 निगेटिव्ह आले आहेत. तर 15 स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. 11 व्यक्तींचे अहवाल रिपीट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 33 जण उपचार घेत असून तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post