विकास कामातून शहराचा कायापालट करणार : आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मी प्रयत्न करत आहे. पक्षीय राजकारणाविरहित सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाला चालना दिली आहे. शहराच्या सर्वच भागामध्ये विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. नगर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळाली आहे. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून नागरिक नगर शहरामध्ये खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे शहरातील उद्योग धंद्यांना चालना मिळते. शहरातील डीपी रस्त्यासाठी शासन दरबारी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक व प्रोफेसर कॉलनी चौकापर्यंतच्या
रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पवननगर येथील नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. लवकरच या रस्त्याचे कामही मार्गी लागेल. उपनगराच्या विकासासाठी या भागातील नगरसेवक नेहमीच पाठपुरावा करत असतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

पवननगर येथील नाल्यावरील पुलाच्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, पै. शिवाजी चव्हाण, निखिल वारे, सुनिल त्रिंबके, बाळासाहेब पवार, सुरेश चव्हाण, योगेश ठुबे, विजय भोसले, मच्छिंद्र वामन, सुनिल शेकटकर, संकेत शिंगटे, भारत शिंदे, अजित पारकर, सतीश ढवण, स्वप्निल ढवण, विलास ढवण, राजेंद्र तागड, लक्ष्मण जावळे, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले की, शहर व उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी आ. संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रभागाच्या विकासाबरोबर शहरामध्ये विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. दर्जेदार कामे व्हावे, याकडे आमचे बारीक लक्ष आहे. विकास कामांबरोबर विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यावर आमचा भर आहे. आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सर्व नागरिकांना बरोबर घेऊन विविध सामाजिक प्रश्न सोडविले जात आहेत. नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धन होण्यासाठी आम्ही नागरिकांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवड व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहे. नवनवीन रस्ते तयार होत असताना दोन्ही बाजूने लगेच मोठमोठी वृक्षे लावली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post