पोलिस वसाहतीतील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : खा. डॉ. सुजय विखे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: येथील पोलिस मुख्यालयात अनेक पोलिस बांधव आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. अनेक वर्षांपासून या
परिसरामध्ये विविध नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी लवकरच बांधकाम विभाग, मनपा प्रशासन, पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक लावून पोलिस वसाहतीचा विकास आराखडा तयार करुन या भागातील पोलिस बांधवांचे प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. पोलिस बांधव हे समाजातील महत्त्वाचा घटक आहेत. समाजामध्ये ते २४ तास संरक्षणाचे काम करत आहेत. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उभे राहून पहारा देत आहेत. पोलिस बांधवांच्या वसाहतीतील नागरी प्रश्न सोडविणे माझे कर्तव्य आहे,
लवकरात लवकर शासन दरबारी पाठपुरावा करुन या भागातील वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे, तोही लवकरात लवकर सोडविणार असल्याचे प्रतिपादन खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

पोलिस मुख्यालयातील नाल्यांची व विविध समस्यांची पाहणी करताना खा. सुजय विखे पाटील. समवेत मा. नगरसेवक
अँड. धनंजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, संजय ढोणे, सतीश शिंदे, पीआय हाटकर, मितेश शहा, मंदार लश्कर, संकेत पवार, सिद्धांत ससाणे, अभिजित ढोणे, चैतन्य जाधव, राहुल मुथा, महेश महादर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अँड. धनंजय जाधव म्हणाले की, या पोलिस वसाहतीतून मोठे दोन उघडे नाले वाहत असल्यामुळे
मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने तसेच या गटार तुंबल्यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे व गटारीचे पाणी पोलिसांच्या घरामध्ये शिरत आहे. त्यामुळे या भागामध्ये पोलिसांना राहणेसुद्धा मुश्किल झाले आहे. या भागातील प्रश्न सुटावे,
यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच या भागातील पोलिस बांधवांचा राहण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाने वसाहतीचा प्रश्न मंजूर केला आहे, ही कामे लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी पाठपुराव करणार आहे. खा. सुजय विखे यांच्याकडे तत्काळ नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post