तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार

 


माय अहमदनगर वेब टीम

भंडारदरा - सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहून जाणारे 165 दलघफू पाणी अडविल्यास नाशिक, नगरसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून यासंदर्भात माहिती. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याने सदाशिव लोखंडे, शेंडीचे सरपंच दिलीपराव भांगरे, ग्रामस्थ व व्यापारी यांच्याहस्ते साडी, श्रीफळ अर्पण करून विधिवत जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार सदाशिव लोखंडे, शेंडी गावचे प्रथम नागरिक दिलीपराव भांगरे व ग्रामस्थ, व्यापारी यांच्या हस्ते प्रवरा मातेला साडी चोळी, श्रीफळ अर्पण करून विधिवत जलपूजन करण्यात आले.

खासदार झाल्यानंतर 6 वर्षात पहिल्यांदा जलपूजन करण्याचे भाग्य लाभल्याने सरपंच,ग्रामस्थ व व्यापारी यांचे आभार मानले. त्यावेळी अकोले तालुक्यासह भंडारदरा पर्यटन विकास होण्यासाठी घाटघर-चोंढे (शहापूर) फोडण्याची आग्रही मागणी सरपंच दिलीप भांगरे यांनी केली. यास खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपण शिष्टमंडळ घेऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

त्यावेळी धरण शाखाधिकारी अभिजित देशमुख, वसंत भालेराव, उपसरपंच दत्तू भांगरे, सोपान अवसरकर,गोगा भांगरे, सुरेश घाटकर, अनिल अवसरकर, राहुल मोहोड, बबलू गुडेप्,हेमंत अवसरकर, सचिन नेवासकर,प्रमोद धादवड,जवाहर शहा, राजु राठोड, पांडुरंग अवसरकरआदी उपस्थित होते. तर पौरोहित्य बाळासाहेब लोहगांवकर यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post