औरंगाबादची निवडणूक 3 महिने लांबली,
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करीत असलेल्या कोराेनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. एप्रिलमध्ये होणऱ्या औरंगाबादसह सर्व महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. यात ११ महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये कोरोनाच्या प्रभावी उपाययोजनांच्या दृष्टीने सर्व महसूल विभागांसाठी एकूण ४५ कोटींचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय झाला. राज्यातील सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर केवळ नियमित पूजाअर्चा सुरू ठेवण्याचे व कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राजकीय पक्ष, संघटनांच्या कार्यक्रम, सभा, समारंभ, मेळाव्यांना परवानगी देऊ नये, असे आदेश सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Post a Comment